सेतू अभ्यास पूर्व चाचणी-७ वी | Bridge Course Pre Test-7th

सदर सेतु अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.

सेतू अभ्यास (२०२3-२४) 

१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheet) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.

४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पती / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांत ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत  उपलब्ध करून देण्यात येईल.

अनु. क्र. Click
गणित Download 
मराठी Download 
इंग्रजी Download 
विज्ञान Download 
सामाजिक शास्त्र Download 
See also  Bridge Course For std 7th - Day- 03 | सेतू अभ्यासक्रम इयत्ता 7 वी - दिवस-03

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page